सांगली : मदनी चॅरिटेबल ट्रस्ट,
सांगली व आयजीसी फोरम, पुणे यांच्या संयुक्त
विद्यमाने मुस्लिम अल्पसंख्याक गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'मेरिट फेलोशिप योजना २०२६-२७' चा प्रारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. के.
जी. पठाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून फैज इनामदार (सोलापूर) व हाजी मुनाफ नदाफ
(तासगाव) उपस्थित होते. उद्घाटन ब्रिगेडियर (एव्हीएसएम) एन. एम. नदाफ यांच्याहस्ते
झाले. पहिल्या सत्रात व्हीईएस मुंबईचे संस्थापक अजय देवकर यांनी 'पालकांनो जाणकार व जबाबदार बना' या विषयावर
मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक
अनीस कुरेशी यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर संधींबाबत माहिती दिली. योजनेअंतर्गत ८
व ९ जून रोजी 'दहावीनंतरचे शैक्षणिक प्रवेश मार्ग' या विषयावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना
शैक्षणिक प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन देणारा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी
सांगितले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान
पठाण, सचिन कोळी आदींसह अन्य उपस्थित होते.
0 Comments