यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिरास उदंड प्रतिसाद
सांगली : प्रशासकीय सेवेत जाणे म्हणजे समाज
परिवर्तनाची एक सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य
आणि कठोर मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या परीक्षांमध्ये उत्तम
यश मिळवू शकतात, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त संजीता
महापात्र यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि
सांगली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा
परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त बोलत
होत्या. या पहिल्याच शिबिरात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या
यशाचा 'रोडमॅप' दिला. महापात्र
म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्याची संधी
नसून, समाजासाठी काम करणारा जबाबदार आणि संवेदनशील अधिकारी
घडवण्याचा प्रवास आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजीची अनिवार्यता किंवा दिल्लीला
जाऊनच अभ्यास करण्याची गरज नाही. आजच्या डिजिटल युगात मराठी माध्यमातून घरबसल्या
अभ्यास करूनही अनेक ग्रामीण विद्यार्थी देशात अव्वल आले आहेत. पुढील जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्त याच शिबिरात घडू शकतात,
अशी अपेक्षा व्यक्त करत महापात्र यांनी परीक्षेची रचना व
अभ्यासक्रमाची ओळख, यशाचा मंत्र दिला. यावेळी अतिरिक्त
आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त दिनेश जाधव, सहायक आयुक्त नकुल जकाते, सहायक आयुक्त विनायक शिंदे
आणि - सिस्टीम मॅनेजर प्रद्युम्न जोशी, ग्रंथपाल संतोष
बेलवलकर, - राहुल मुळीक, महेश पाटील,
सुहास व्हटकर, सामाजिक कार्यकर्ते राकेश
दड्डड्नावर यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
0 Comments