सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे
जयंती महोत्सव समिती, सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित
करण्यात आलेला साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहपूर्ण
वातावरणात संपन्न झाला. विविध सामाजिक, सांस्कृतिक व
प्रबोधनपर कार्यक्रमांनी महोत्सवाला विशेष रंगत आणली.
महोत्सवाच्या प्रारंभी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनातील
अधिकारी व कर्मचारी, सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,
सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य,
सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने
करण्यात आले होते. आकर्षक सजावट, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर जयंतीमय झाला होता. महोत्सव
यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव
समिती,
सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन नेताजीराव कांबळे यांच्या
अध्यक्षतेखाली हा संपूर्ण महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध आणि दिमाखदार वातावरणात पार
पडला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी
आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
0 Comments