Ticker

6/recent/ticker-posts

आमच्या सांगण्यावरून सभापतींनी 'एमआरडीपी'चे काम बंद पाडले : महापौर सूर्यवंशी

 सांगली : कार्यारंभ आदेश नसताना ठेकेदाराने एमआरडीपीचे काम सुरू केले होते. त्यामुळे आम्ही सर्व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यावरून सभापती अतुल माने यांनी काम बंद पाडले. विरोधी पक्षनेत्यांनी टक्केवारी आणि भाजपमधील गटबाजीवरून हवेत गोळीबार करू नये, असा पलटवार महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला.

'महापालिका टक्केवारीचा अड्डा झाली आहे. भाजपच्या सत्तेत वरपासून खालपर्यंत टक्केवारीसाठी भांडणे दिसत आहेत. भाजप महापालिकेला कलेक्शन सेंटर बनवेल', अशी टीका विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांनी केली होती. त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी, सभापती अतुल माने, सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

 महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) राबविला जाणार आहे. महापालिकेला या कामासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. या कामाच्या उद्घाटनाला अख्ख्या मंत्रिमंडळाला आणायचे आहे. तोपर्यंतच ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले. कार्यारंभ आदेश नसतानाही काम सुरू केले. त्यामुळे सर्व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आमच्या सांगण्यावरून सभापती अतुल माने यांनी काम बंद पाडले. यात टक्केवारीचा विषय नाही. तीनही शहरातील कामांसाठी मोठा निधी येत आहे. आम्ही विकासाचा अजेंडा पूर्ण करणार आहोत. गटबाजीचा विषय नाही. सर्वजण एकसंधपणे काम करत आहोत. भाजप, राष्ट्रवादीचे गटनेते म्हणाले...

भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी म्हणाले, विकास कामात आम्ही अतिशय बिझी आहोत. विरोधी पक्षनेते चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, एमआरडीपीचे काम बंद पाडण्यापूर्वी सभापती अतुल माने यांनी आमच्याशी चर्चा केली होती. वर्कऑर्डर नसताना महापालिकेत टक्केवारी सुरू असल्याचा तसेच भाजपमध्ये गटबाजी असल्याचा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा आरोप म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखा प्रकार आहे. टक्केवारी सुरू असल्याचे वाटत असेल तर उघड विरोध करा, उगीच हवेत गोळीबार नको. काहीतरी आरोप करून प्रसिद्धी मिळवणे हा चव्हाण यांचा उपद्व्याप दिसत आहे, अशी टीका महापौर सूर्यवंशी यांनी केली. आम्ही विकास कामांच्या मागे आहोत, टक्केवारीच्या आरोपांनी आमच्या अंगाला भोके पडत नाहीत, असेही सूर्यवंशी म्हणाले.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील पूर नियंत्रण व पावसाळी पाणी निचरासाठी काम सुरू करणे गैर आहे. त्यामुळे कामा बंद पाडण्यास आमची सहमती होती.

राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, संत दासराम केळकर महाराज शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यांची विक्री सर्वोच्च न्यायालय व शासन निर्णयानुसार झालेली आहे. न्यायालय व शासन निर्णयाचा संदर्भी देऊन राजारामबापू बँकेने तीन दुकानगाळे भाड्याऐवजी खरेदीने मिळावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार ठराव झाला आहे. त्यात टक्केवारीचा प्रश्नच उद्भवत नाही.

Post a Comment

0 Comments