नवी दिल्ली : डिजिटल
प्लॅटफॉर्मनी त्यांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या मजकुराची पूर्ण जबाबदारी
घ्यावी. समाजाने हजारो वर्षांत उभारलेल्या संस्थांवरील विश्वास दृढ ठेवणे ही
प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. ऑनलाईन माध्यमांमुळे मुलांची, तसेच सर्व
नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत, असे स्पष्ट मत केंद्रीय केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले.
डिजिटल प्लॅटफॉर्मना
जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत ऑनलाईन सुरक्षेबाबत कठोर भूमिका मांडली. नवी
दिल्ली येथे झालेल्या डिजिटल न्यूज पब्लिशरच्या अधिवेशनात वैष्णव बोलत होते.
मंत्र्यांनी कृत्रिम
बुद्धिमत्तेच्य गैरवापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. चेहरा, आवाज किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर करून परवानगीशिवाय तयार केलेले 'सिंथेटिक' किंवा डीपफेक कंटेंट स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. संबंधित व्यक्तीची संमती न घेता असे कंटेंट तयार करू नयेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
0 Comments