Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमाने उत्साहात साजरा

 


सांगली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व अशा मंगलमय वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्यानिमित्त सांगलीतील ऐतिहासिक मारुती चौकात शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि मुख्य चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी भव्य आणि ऐतिहासिक 'महाद्वाराची' प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. सायंकाळी विशेष 'लेसर शो'ने सांगलीकरांचे डोळे दीपवून टाकले.

या ऐतिहासिक दिनानिमित्त भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकारातून मारुती चौकात 'अभंग रिपोर्ट' या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोहळ्याप्रसंगी सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला माजी आमदार दिनकर पाटील, ज्येष्ठ नेत्या भारती दिगडे, सुरेश बंडगर, डॉ. संजय पाटील यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments