Ticker

6/recent/ticker-posts

त्या वादग्रस्त जागेजवळ दिशादर्शक उभारणीचे काम : खोकीधारकांचा विरोध

 

सांगली : विश्रामबाग चौकातील आलदर चौकातील अतिक्रमणे काही महिन्यांपूर्वी महापालिकेने हटवली होती. यातील काही खोकीधारकांची अतिक्रमणे काढताना महापालिका प्रशासनाने कायदेशीर बाबी पाळल्या नसल्याने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सदरची कारवाई बेकायदेशीर ठरवत संबंधित खोकीधारकांना दिलासा आहे.

दरम्यान, या जागेजवळ महापालिकेने दिशा दर्शक उभारण्यासाठी सिमेंटचे फौंडेशन केले असून त्याला संबंधित खोकीधारकांनी विरोध केला आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मागासवर्गीय खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत रणभिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. ते म्हणाले, विश्रामबाग चौकातील खोकी महापालिका प्रशासनाने हटवली. खोकीधारक व जागा मालक यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहे. याबाबतची कागदपत्रे तत्कालीन आयुक्तांना दाखवण्याचा प्रयत्न खोकीधारकांनी केला. मात्र त्यांनी काही ऐकून न घेता हुकूमशाही प्रवृत्तीने खोकी हटवली. महापालिकेने या जागेत सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले आहे. याला आमचा विरोध असून महापालिकेची ही कृती न्यायालयाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केल्याचे रणभिसे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments