सांगली : सांगलीत कृष्णा नदीकाठावरील वसंतदादा स्मारक ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत अडीच किलोमीटरचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. चौपाटी, उद्यान, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, फूड कोर्ट, बोटींगचा समावेश आहे. मंदिरे, घाटही सुशोभित केले जाणार आहेत. सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जाईल, अशी माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. गाडगीळ यांनी मंगळवारी महापालिकेत पत्रकार परिषद
घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवटी, सभागृह नेते संदीप
आवटी, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
आ. गाडगीळ म्हणाले, सांगलीत कृष्णा
नदीकाठ विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली
आहे. आयुक्त संजीता महापात्र यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीमध्ये बोटिंग सुविधा करण्यात येणार आहे. आयर्विन
पूल ते नवीन बायपास पुलापर्यंतचे नदीचे पात्र बोटींगसाठी उत्कृष्ट आहे. त्यामुळे
त्यादृष्टीने येथे विकास होणे आवश्यक आहे. याशिवाय नदीकाठी नागरीकांसाठी सिंथेटिक
वॉकिंग ट्रॅक करण्यात येणार आहे.
स्थायी समितीचे सभापती अतुल माने म्हणाले, महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात २ याप्रमाणे २० प्रभागात ४०
उद्याने 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान योजनेंतर्गत
विकसित करण्यात येणार आहेत. महापालिका निधीतून १२ कोटींचा खर्च येणार आहे.
सांगलीतील १२८ भूखंडावर नाव लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मिरजेतील ९८
भूखंडांसदर्भात दि. १५ जुलै रोजी जाहीर नोटीस प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर
कुपवाडमधील ११८ भूखंडाबाबत नोटीस निघेल.
0 Comments