जिल्ह्यात प्रमुख राजकीय ताकदीचं समसमान विभाजन
सांगली : सांगली जिल्ह्यात
६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले. प्रमुख राजकीय ताकदीचं समसमान विभाजन झालं आहे.
जत नगरपरिषद आणि आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा
झेंडा फडकला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी
मुसंडी मारली आहे. विटा आणि शिराळा नगरपरिषदेत शिवसेना
(शिंदे) पक्षाने विजय
मिळवला. ईश्वरपूर आणि आष्ट्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुत्तीचा
धुव्वा उडवला. आमदार जयंत पाटील यांनी
ईश्वरपूरचे नगगध्यक्षपद भाजपकडून खेचून घेतले. पलूस नगग्पंचायत निवडणुकीत
काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला, तर
तासगाव नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार संजय
पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विकास आघाडीने आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शग्दचंद्र पवार) पक्षाचा
अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
जिल्ह्यात झालेल्या सहा नगरपरिषद, दोन
नगर पंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दोन, भाजपने
दोन व शि: वसेना शिंदे गटाने दोन ठिकाणी झेंडा फडकावला तर, काँग्रेस
व माजी स्वाभीमानी आघाडीने एका ठिकाणी विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वच पक्षातील
नेत्यांनी विशेषतः आमदारांनी आपापले गड राखले. ईश्वरपूर, आष्टा येथे आ.
जयंत पाटील, शिराळ्यात आ. सत्यजित देशमुख, पलूसमध्ये
आ. विश्वजीत कदम, विट्यात आ. अनिल बाबर तर, आटपाडी
व जतमध्ये आ. गोपीचंद पडळकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. तासगावात मात्र
विद्यमान आ. रोहित पाटील यांना धक्का बसला आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपरिषद, दोन नगरपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले होते. गेले काही दिवस निकालाची प्रतिक्षा व उत्सुकता होती. ती रविवारी अखेरसंपली. सकाळी ११ वाजल्यापासूनच निवडणूक निकालाचे कल बाहेर पडू लागले तसा विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष सुरु झाला. सांगली जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व ? हे या निवडणुकीत स्पष्ट होणार होते. मात्र निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतही काही ठिकाणी बिघाडी होती. त्यामुळे कोणत्याच एका पक्षाला जिल्ह्यावर वर्चस्व राखता येणार नसल्याची शक्यता होती. ती निवडणूक निकालानंतर खरी ठरली. प्रत्येक तालुक्यात आमदार व नेत्यांनी सोयीची भूमिका घेतली होती. ती त्यांच्या पथ्यावर पडल्याचेही निकालानंतर स्पष्ट होत आहे. उरुण-ईश्वरपूरमध्ये जयंत पाटीलच किंगमेकर; राष्ट्रवादीचा विजय उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेत माजी मंत्री आ. जयंत पाटीलच किंगमेकर ठरले आहेत. जयंतरावाच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नगराध्यक्षासह २४ जागांवर विजय मिळवून विरोधी भाजप, महायुतीचा दारुण पराभव केला. येथे राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांना धूळ चारली. जयंत पाटील यांना शह देण्यासाठी येथे भाजपने मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला जनतेने प्रतिसाद दिला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. मागील निवडणुकीत येथे भाजपने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांना भाजपने जबर शह दिला होता. आता जयंत पाटील यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

0 Comments