विकासकामांसोबत माणसं जोडा : नूतन नगरसेवकांचा सत्कार
सांगली : भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो
पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर प्रेम करतो. म्हणून कसंही
वागून चालणार नाही. पद मिळाले नाही म्हणून पक्षाशी प्रतारणा योग्य नाही. ही भूमिका
बदलली पाहिजे. पक्षाशी केलली गद्दारी भाजप कधीही खपवून घेणार नाही, असा
इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत नूतन नगरसेवकांना दिला तसेच
शहरातील विकासकामे करताना सोबतच माणसंही जोडा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले.
महापालिकेत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार
सोहळा व पक्षाचा विजयी मेळावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येथील
खरे मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. यावेळी पालिकेतील पराभूत उमेदवारांचाही
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश
खाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील, प्रदेश
उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर, माजी शहर
जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद
देशपांडे, सुरेश आवटी, बाळासाहेब यादव उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप
देशात २२ मुख्यमंत्री असणारी पार्टी आहे, अमेरिकेची लोकसंख्या २२ कोटी आहे तर,
भाजपचे
देशातील सदस्य २२ कोटी आहेत. अशा पार्टीला जर कोणी डिश केले तर केंद्रीय लेवकलला
सुद्धा तसेच शासन आपण करतो. पार्टी खूप प्रेम करते म्हणून आपण कसंही वागून चालणार
नाही. एखाद्याला सगळं दिले तरी तो पार्टीशी गद्दारी करतो, हे आता खपवून
घेणार नाही, आता पाच वर्ष तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
नगरसेवक म्हणून रस्ते, गटारी आदी नागरी समस्या सोडवायच्या आहेतच,
पण
केवळ तेच काम नाही. मनपा महणून स्वतःचे काही प्रकल्प राबवावे लागतील. माणसांचा
विकास म्हणजे विकास आहे. त्यासाठी माणसांना जोडणारे उपक्रम राबवा. त्यासाठी
तुम्हाला सीएसआर फंडातून निधी मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
यांनी यावेळी नगरसेवकांना आवाहन केले.
केवळ पाणी, गटार, रस्ते तितकच आपलं काम नाही तर, आपल्या शहराची, शहराच्या विकासाचे व्हिजन हे आपल्याकडे असले पाहिजे, त्यासाठी खूप आपण अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, नेटवर बसलं पाहिजे. जगातली शहरं ही कशी आहेत, त्यांनी काय केले असा अभ्यास करुन तेथील प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री, आमदारांकडे आग्रह धरला पाहिजे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेत
नगरसेवक म्हणून कमिशन मिळवण्याची पतपेढी नव्हे. पद दिले म्हणून काहीही चालणार
नाही. जुन्या आठवणी उगळून काढणार नाही. गतवेळी ४३ नगरसेवक निवडून आले होते.
त्यापैकी सात नगरसेवक फुटल्याने सत्ता गमवावी लागली होती. माझ्यापासून पार्टीचे
नुकसान होणार नाही, अशी वागणूक हवी.
आ. गाडगीळ म्हणाले, नगरसेवक आल्याने
आता गेली तीन वर्ष आमच्यावर असलेला अतिरिक्त ताण कमी होईल असे वाटते. पक्षाचे
कार्यक्रम आपण राबवले पाहिजेत. नूतन नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अद्यावत जनसंपर्क
कार्यालय सुरू करावे. नागरिकांचे फोन घेऊन त्यांच्याशी बोलावे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिकेला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
आहे. प्रास्ताविक संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी केले.
आ. सुरेश खाडे म्हणाले, प्रभागात
नगरसेवकांनी कार्यालय सुरु करावीत त्यातून लोकांशी संपर्क ठेवा. पाच वर्ष
नगरसेवकाला पहिलेच नाही अशा तक्रारी प्रचार करताना अनेकदा आल्या. त्या यापुढे येऊ
नयेत याची काळजी घ्या. महिन्यातून एक जनता दरबार घेऊन तेथे आमच्यासह अधिकाऱ्यांना
बोलवा. जागेवर नागरिकांचे प्रश्न सोडवा. जे नगरसेवक निवडून आले तेवढाच मान पराभूत
नगरसेवकाला मिळणार आहे त्यांनाही प्रभागात कार्यालय सुरु करावे, अशी
सूचना आ. खाडे यांनी केली.
0 Comments