सांगली : सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट
(CBRI), रुरकी यांच्यामार्फत आयोजित भारतीय पारंपरिक आवास उत्थान पुरस्कार
२.० (BPAUP २.०) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत येथील
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांनी इन्स्टिटयूट विभागात (Institute
Catego१८) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
भारतीय पारंपरिक कारागिरी, कौशल्ये
व वास्तुकलेचा जतन व संवर्धन या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील
नामांकित आर्किटेक्न र महाविद्यालये, विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग
घेतला होता. अशा चुरशीच्या राष्ट्रीय स्पर्धेत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ
आर्किटेक्चरने प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची व
सर्जनशीलतेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे.
या उल्लेखनीय यशामागे महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन तसेच
प्राध्यापकांचे व प्राचार्या डॉ. अरुंधती वाटेगावे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे
ठरले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष समीर बिरनाळे, संचालक सागर
बिरनाळे आणि प्राचार्या डॉ. अरुंधती वाटेगावे यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे
अभिनंदन केले आहे. हे यश महाविद्यालयासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद
मानले जात आहे.
0 Comments