Ticker

6/recent/ticker-posts

चिंतामणराव महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात

 

सांगली : येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात दि. १६ ते २४ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाचा शेवट पारंपरिक दिन साजरा करुन करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सुदर्शन कोळी व त्यांच्या टीमने सादर केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार तसेच दांडपट्ट्याने एका फटक्यात लिंबू कापणे तसेच लाठीकाठीने एका फटक्यात नारळ फोडणे असे प्रयोग विद्यार्थ्यांसमोर करुन दाखवले. प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष रवींद्र ब्रह्मनाळकर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments