सांगली : सांगली, मिरज, कुपवाड
रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग अकॅडमी सांगलीच्या २४ खेळाडूंनी एक तास २६
मिनिटे २६ सेकंद विविध वेशभूषेत सलग स्केटिंग करत नवा विक्रम केला. या विक्रमाची
नोंद स्पोर्टस् वर्ल्ड रेकॉर्ड, अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनायटेड
इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नूतन नगरसेविका गीता
पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे संयोजन व मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय
स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे, परवीन शिंदे, आयेशा मुलाणी
यांनी केले. खेळाडूंना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पवार,
प्रदीप
घडशी यांचे प्रोत्साहन लाभत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज देशमुख,
गौराज
कांबळे, अहद मुलाणी, सई शिंदे, मुसद्धिका मुलाणी
यांनी परिश्रम घेतले.
रेकॉर्ड केलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
- विहा खाडे, श्लोक कुंभार, इरा हज्जे,
आर्यन
बारीताया, आर्दश ऐवळे, तन्वी दुधाळे, रिद्धेश संकपाळ,
अशहद
आत्तार, सम्राज्ञी पत्रावळी, सिद्धार्थ भगत, आयुष कोरडे,
सर्वज्ञ
कुलकर्णी, जैनिक शहा, राघव पटेल, वेणीसा बिझ्झा,
ऋग्वेद
देशमुख, दानिश पठाण, विराज नागराळे, विराज व्हनमोरे,
फैजान
रहिमान, आदित्यकुमार गायकवाड, शौर्य भुई, रुद्र महाजन,
सई
गायकवाड.
0 Comments