दोघांना अटक : तीन गुन्हे उघडकीस
सांगली: विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून
दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद
केले. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून ३ लाख ५० हजार रुपयांच्या चार
दुचाकी हस्तगत केल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली.
निहाल शब्बीर नदाफ (वय २०, रा. प्लॅट क्र. १, स्टार
रेसिडेन्सी, निपाणीकर कॉलनी, मिरज. मूळगाव बस
स्थानकानजीक, अकीवाट, ता. शिरोळ,
जि.
कोल्हापूर) आणि मंदार रमेश चांदणे (२१, रा. डॉ.परमशेट्टी हॉस्पिटलच्या
पाठीमागे, शिवाजीनगर, मिरज. मूळगाव -मांग वस्ती, ऐतवडे
खुर्द, ता. वाळवा) अशी चोरट्यांची नावे आहेत.
घटनेची माहिती अशी, मागील काही
दिवसात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली
होती. त्याअनुषंगाने चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने
स्वतंत्र पथक स्थापन केले होते. पथकास सांगली ते टिंबर एरिया या रस्त्यावरील
कनुभाई देसाई कॉर्नर परिसरात दोन युवक विना नंबरप्लेटची दुचाकी घेवून थांबले असल्याची
माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोघेजण एका दुचाकीवर
थांबलेले दिसले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात
घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शंभर फुटी रस्त्यावरील तेजस अपार्टमेंटचे पार्किंग,
विश्रामबाग गणपती मंदिरानजीक असणाऱ्या रॉयल आर्केड अपार्टमेंट आणि भारती हॉस्पिटल बाहेर
असणाऱ्या पार्किंग जागेतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी त्यांनी
मिरज येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांती सदर ठिकाणी जाऊन चार दुचाकी जप्त केल्या.
सदरच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस अंमलदार सुजित सूर्यवंशी,
अतुल माने, सुशील मस्के, ऋतुराज होळकर, प्रमोद साखरपे, अजय पाटील यांनी सहभाग घेतला.
0 Comments