जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजायला मी आलो नाही
मिरज : महापालिका निवडणुकीत ज्याची निवडून
येण्याची क्षमता आह, अशा उमेदवारांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी
दिली जाईल. मताचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी
भाजायला मी येथे आलो नाही. काही ठिकाणी माणुसकी महत्त्वाची असते, त्यामुळे
समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिवद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी सांगून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री
पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
काँग्रेस नेते माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी
महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह पंधरा माजी नगरसेवक व विविध पक्षांतील
नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक,
आमदार
इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील,
शहर
जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप, अतहर
नायकवडी, करण जामदार, उत्कर्ष खाडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुणे, बारामती,
गडचिरोली
जिल्ह्यांतील विमानतळे विकसित केली जात आहेत. त्याच पद्धतीने अन्य जिल्ह्यात
सुद्धा विमानतळांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील. राज्यातील २९
महानगरपालिकांच्या पैकी चार मोठ्या महापालिका सोडल्या, तर अन्य
महापालिका स्वतच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत. अशा महानगरपालिकांना
केंद्र, राज्य आणि अन्य निधी उपलब्ध करून देऊन, शहरांचा विकास
केला जाईल. विकास करायचा म्हटले की, जमिनी लागतात मात्र शेतकऱ्यांच्या
जमिनी घेताना कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांना
योग्य प्रकारचा मोबदला दिला जाईल. शक्तिपीठ महामार्ग तयार करताना जनतेला विश्वासात
घेऊन निर्णय घेऊ. मिरजेतील मीरासाहेब दर्यासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी हा
टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे.
माजी महापौर किशोर जामदार, माजी
महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी
दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी,
अंकुश
कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान,
रेखा
विवेक कांबळे, बिलकिस बुजरूक शेख, चंद्रकांत
हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे यांच्यासहित
अनेक पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

0 Comments