Ticker

6/recent/ticker-posts

सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर

 

मनपाचा अतिक्रमणावर बुलडोझर “अन्याय सहन करणार नाही!” 

पृथ्वीराज पवारांचा इशारा

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने विश्रामबाग परिसरात तब्बल २० वर्षांपासून स्थायिक असलेले अतिक्रमण अखेर जमीनदोस्त केले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई पार पडली.

महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारलेले खोके आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान काही नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. काही काळ आयुक्त आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार केल्याचे स्पष्ट करत, रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.



दरम्यान, कारवाईनंतर सर्व खोकेधारकांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. यावेळी पृथ्वीराज भैय्या पवार यांनी थेट इशारा देत म्हटले की, “या कष्टकरी वर्गावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मात्र येत्या दोन दिवसांत सर्व संघटना एकत्र येणार आहेत. जे आमच्यासोबत येतील ते आमचे, आणि जे साथ देणार नाहीत त्यांना आमचा विरोध सहन करावा लागेल.”



या इशाऱ्यानंतर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अतिक्रमण हटविण्याची कारवाई योग्य की अन्यायकारक? पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागल्यास संघर्ष तीव्र होणार कासांगली शहरात आता प्रशासन आणि कष्टकरी वर्ग यांच्यातील संघर्ष कोणत्या वळणावर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments