Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे शिवरायना अभिवादन

 

सांगली : सांगली शहरातील वृत्तपत्र वितरण सेंटरवर पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सर्व वृत्तपत्र विक्रेते, एजंट व वृत्तपत्रांच्या वितरण प्रतिनिधींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवाजी महाराजांच्या जय-जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर संघटनेच्यावतीने सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे पदाधिकारी कृष्णा जामदार, बाळासाहेब मोरे, दीपक वाघमारे, नागेश कोरे, गणेश कटुगी, सचिन चोपडे आदी पदाधिकाऱ्यांनी सेंटरवर स्वच्छता करून शिवजयंतीची तयारी केली.

कार्यक्रमास सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हा सचिव विशाल रासनकर, महापालिका क्षेत्र अध्यक्ष दीपक वाघमारे, राज्य संघटनेचे माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई, माजी महापालिका क्षेत्र अध्यक्ष सचिन माळी, संघटनेचे सांगली शहराध्यक्ष सागर घोरपडे, ज्येष्ठ विक्रेते सुरेश कांबळे, संजय कांबळे, आर. एस. माने, प्रदीप आजगावकर, बसप्पा पट्टणशेट्टी, विशाल पवार, बजरंग कोळी, जावेद शेख, प्रथमेश मोरे, यशवंत जाधव, नारायण माळी, प्रकाश उन्हाळे, अशोक साळुंखे, श्याम जाधव, मुन्ना मुल्ला, प्रकाश भोसले, विजय कांबळे, संजय इंदुलकर, प्रशांत साळुंखे, अक्षय जाधव, बिपिन गवळी, महेश मुजूमदार, समित मेहता, महावीर आष्टेकर, संजय शिंदे, सुभाष बंड्याघोळ, नीलेश कोष्टी, संभाजी पाटील, दीपक बोरकर, शहाजी सरगर, सुनील माळवदकर, महेश वैद्य, प्रकाश शिवशरण आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments