Ticker

6/recent/ticker-posts

भारती विद्यापीठाच्या श्रेयस मोहितेचा बहुमान

 


सांगली : शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयाचा ईएनटीसी विभागाचा विद्यार्थी श्रेयस राजेंद्र मोहिते हा मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे होणार्‍या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनात (एसआरडी) सहभागी झाला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झालेला पहिला विद्यार्थी होण्याचा बहुमान मिळवून श्रेयसने एक नवा इतिहास रचला आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून ते भारती विद्यापीठाच्या शिस्तीचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जात आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, ईएनटीसी विभाग प्रमुख डॉ. श्रुती ओझा यांनी श्रेयसचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments