सांगली : मार्चएन्डला अजून पावणेदोन महिने बाकी
असताना महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षपिक्षा जादा घरपट्टी वसुली करण्यात यश
मिळवले आहे. मार्च २०२५ अखेर ६२.२५ कोटी रुपये वसूल झाले होते. यावेळी दि. ९
फेब्रुवारी २०२६ अखेर ६६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. मार्च २०२६ अखेर आणखी १९ कोटी
रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली
मालमत्ता कर (घरपट्टी) विभागाने चालू कर व थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली
आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक
आयुक्त आकाश डोईफोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यासाठी मेहनत घेत आहेत.
घरपट्टीची चालू मागणी (वार्षिक मागणी) सुमारे
७४ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४६.५० कोटी रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीची रक्कम
तब्बल ९४ कोटी रुपये आहे. त्यापैकी १९.५० कोटी रुपये वसूल झाले आहेत. थकीत घरपट्टी
वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ता सील करणे, ती जप्त करून लिलाव काढण्याची
प्रक्रिया अवलंबण्याचा पवित्रा स्पष्ट केलेला आहे. घरपट्टी वसुलीसाठी पाणी कनेक्शन
तोडण्याची कार्यवाही करण्याचाही इशारा दिलेला आहे. घरपट्टी वसुलीसाठी पथके स्थापन
करण्यात आली आहेत.
आयुक्त सत्यम गांधी यांच्या मागदर्शनाखाली व
सूचनेनुसार मालमत्ता कर विभागाची वसुली मोहीम जोरदारपणे सुरू आहे. मागीलवर्षी ३१
मार्च २०२५ अखेर ६२ कोटी वसुली झाली होती. यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या
आठवड्यापर्यंत ६६ कोटी रुपये वसुली झाली आहे. अजून पावणेदोन महिने बाकी आहेत. या
कालावधीत जास्तीत जास्त वसुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त, आकाश डोईफोडे यांनी दिली
0 Comments