Ticker

6/recent/ticker-posts

घरपट्टीविषयी तक्रारींचे तत्काळ निराकरण करा : महापौर सूर्यवंशी यांचे आदेश;

 

सांगली : नागरिकांच्या घरपट्टी, पाणीपट्टीविषयक तक्रारींचे तत्काळ निराकरण करा, दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ ही वेळ केवळ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी राखीव ठेवा, असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले. घरपट्टी वसुलीचे ८५ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी यांनी शुक्रवारी महापालिकेच्या मंगलधाम प्रशासकीय इमारतीत मालमत्ता कर (घरपट्टी) विभागाची बैठक घेतली. उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे, अधीक्षक वाहिद मुल्ला तसेच कर्मचारी उपस्थित होते. चालू आर्थिक वर्षात आजअखेर ६६ कोटी रुपये इतकी घरपट्टी वसूल केल्याबद्दल महापौरांनी वसुली विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. दि. ३१ मार्चअखेर एकूण ८५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा. घरपट्टी आणि पाणीपट्टी हा महापालिकेचा आर्थिक कणा आहे. या उत्पन्नातूनच शहराचा विकास साधला जातो, असे नमूद करत महापौर सूर्यवंशी यांनी, कर्मचाऱ्यांना उर्वरित काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे आवाहन केले. वसुलीची उद्दिष्टे पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील, असे आश्वासन देण्यात आले.


Post a Comment

0 Comments