Ticker

6/recent/ticker-posts

महा – अर्थसंकल्प : प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि सुशासन

 


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नवमहाराष्ट्राची गुढी उभारणारा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल एक ट्रिलियन डॉलरकडे सुरू असून, २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न या अर्थसंकल्पाने दाखवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला अर्थसंकल्प चार स्तंभांवर उभा केला. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि सुशासन असे हे चार स्तंभ असून, प्रत्येक स्तंभावर चार उपक्षेत्रांची म्हणजे चारही स्तंभांवर सोळा उपक्षेत्रांची भिस्त असेल. हे चार स्तंभी सूत्र बंधिणाऱ्या या अर्थसंकल्पाने पहिली आनंदवार्ता महाराष्ट्राच्या बळीराजाला दिली. अस्मानी संकटांचे तडाखे बसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंतची शेतकी कर्जमाफी जाहीर केली. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनु‌दानही घोषित केले. सिंचनासाठी भरीव तरतुदी करतानाच वीज बिल माफी योजना सुरू ठेवण्यासाठी तब्बल २० हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. लाडकी बहीण सत्ताधाऱ्यांना आता ओझे वाटू लागली आहे, हा मध्यंतरी पसरलेला गैरसमज या अर्थसंकल्पाने दूर केला. ही योजना यापुढेही सुरू राहील आणि लाडक्या बहिणीच्या जोडीला आणखी २५ लाख लखपतीदीदी उभ्या करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला. मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणाच्या पलीकडे असलेल्या शहरांचा शाश्वत विकास करण्यासाठी दहाहून अधिक सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यासोबतच ५० हुन अधिक बहुउपयोगी शहरी समूह विकसित करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

अर्थ संकल्पात समाविष्ट अन्य बाबी बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, तृतीयपंथी यांच्या सर्वांगीण विकासाकरिता धोरण जाहीर करण्यात आले असून, त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल, तर मुंबईतील बांद्रे येथे चर्मकला डिझाईन व उत्पादन अध्यायावत केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

दिव्यांग व्यक्तींकरिता राज्यात ३६ कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना आता दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये दिले जातील.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड (रायगड) येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरिता विकास आराखडा तयार करण्यात येईल. महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे हे विशेष वर्ष लक्षात घेता २०२६-२७ हे वर्ष 'सामाजिक समता व समरसता वर्ष' म्हणून साजरे करण्यात वेईल. त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा नियोजित आहे.

सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला, तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे जतन संवर्धन व जीणर्णोद्धार.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मगावी कटगुण येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

पवनार, जिल्हा वर्धा ते पत्रादेवी, जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तिपीठ महामार्गाच्या महामार्ग कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित सरेखनास मान्यता देण्यात आली असून, भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बराचासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचे विशेष वर्ष म्हणून २०२६-२७ हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजरे करणार.

सातारला अजिंक्यताराचे, संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार

महात्मा फुलेंच्या जन्मगावी मौजे कटगुण (सातारा) येथे भव्य स्मारक उभारणार, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र.

महाडला चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधा उभारणार.

संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंती वर्ष म्हणून गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार. ग्रामसमृद्धी अभियान राबवणार,

७५ गावांमध्ये 'एआय'च्या सहाय्याने जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवणार,

सांगली, कोल्हापूरच्या महापुरासाठी 2240 कोटी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २२४० कोटींचा प्रकल्प

कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोन्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडयातील दुष्काळग्रस्त भागांत वळवणार

दमणगंगा बैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी १३ हजार ४९७ कोटींच्या कामांना मान्यता

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या ७ हजार ४६५ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता

दिवंगत अजित पवार यांना साजेसे स्मारक उभारणार. त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याचीही घोषणा.


Post a Comment

0 Comments