मुंबई : निधी टंचाईमुळे योजना लवकरच बंद पडणार
असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चपराक लगावली
असून, राज्यात लोकप्रिय बहीण योजना यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे
मुख्यमंत्री फडणवीस नग यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. या
योजनेसाठी भरीव तरतूद करून त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, एकल महिलांच्या कल्याणासाठी सर्वेक्षण
सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर एकल महिलांच्या कल्याणासाठी धोरण आणले जाणार आहे.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती
दीदी' झाल्या आहेत. या आर्थिक वर्षात आणखी २५ लाख 'लखपती दीदी'
करण्याचे
सरकारचे उद्दिष्ट आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी
हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल
जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे.
0 Comments