Ticker

6/recent/ticker-posts

ऊर्जा-इंधन बचत करा, अनावश्यक खर्च टाळा : महापौरांचे आवाहन : स्वतः ही चालत आले महापालिकेत

 


सांगली : सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा, इंधन बचत करावी. स्वदेशी उत्पादनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करावा. तसेच अनावश्यक खर्च टाळावा, असे अवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत महापौर धीरज सूर्यवंशी महापालिका कार्यालयात वाहनाना न येता चालत आले. यावेळी नागरीकांना अवाहन करताना ते म्हणाले, कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळ भेटीदरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा. शक्य त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तसेच वाहनांचा अनावश्यक वापर टाळावा. कार्यालयीन कामकाज, बैठका, प्रशिक्षण व चर्चासत्रे शक्यतो ऑनलाइन पद्धतीने करावीत. शासकीय तसेच वैयक्तिक स्तरावर विजेची बचत करावी व अनावश्यक विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. सौरऊर्जेचा वापर वाढवून 'प्रधानमंत्री सूर्यघर' योजनेचा लाभ घ्यावा. स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे व अनावश्यक खर्च टाळावा. खाद्यतेलाचा मर्यादित वापर करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी.

आजच्या परिस्थितीत ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व राष्ट्रीय हित जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व घटकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण निर्माण करावे, असे आवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केले.

संवर्धन मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. फ्लेक्स, बॅनर, सजावटीच्या विद्युत रोषणाईचा कमीत कमी वापर करून साधेपणा व ऊर्जा बचतीचा संदेश द्यावा, असे अवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केले.


Post a Comment

0 Comments