Ticker

6/recent/ticker-posts

इंधन बचावसाठी भाजपतर्फे सायकल रॅली

 


सांगली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपतर्फे बुधवारी सकाळी सांगली शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता उत्साहपूर्ण वातावरणात या रॅलीला सुरुवात झाली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुष्पराज चौक येथे रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण

संवर्धन, प्रदूषणमुक्त शहर आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यामध्ये नीता केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, बाळासाहेब बेलवलकर, संदीप कुकडे, मनीषा कुकडे, नगरसेविका अनिता पवार, भूपाल सरगर, सरचिटणीस केदार खाडिलकर, विशाल पवार, विश्वजित पाटील, रमेश आरवाडे, वैशाल पाटील, निवेदिता शिंदे, सुमेघ केळकर चंद्रकांत मोहिते आदी सहभागी झाले होते.

या सायकल रॅलीची संकल्पन श्रीरंग केळकर यांची होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, युद्धजन्य परिस्थितीत इंधन बचतीची गरज अधोरेखीत केली. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी सायकलच वापर वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments