Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी महाराज पुतळा उभारणीचे भूमिपूजन तब्बल आठ वर्षांनी लाभला मुहूर्त

 


सांगली :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून गुरुवारी येथील त्रिकोणी बागेत संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन झाले. पुतळा उभारणीसंदर्भात गेली आठ वर्षे केवळ चर्चाच सुरू होत्या. आश्वासने दिली जात होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली जात होती. पण प्रत्यक्षात जागा निश्चित होत नव्हती. अखेर भूमिपूजन झाल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थायी समितीचे सभापती अतुल माने, काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दिन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, नगरसेवक मयूर पाटील, विष्णू माने, लक्ष्मण नवलाई, सुरेश बंडगर, नगरसेविका साक्षी बोरगावे, प्रार्थना शिंदे, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, आशा पाटील, अॅड. अमित शिंदे, हरिदास पाटील, युनुस महात, शहाबाज रंगारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

चबुतरा व पुतळा उभारण्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे. आता तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी ऋषिकेश पाटील यांनी केली.


Post a Comment

0 Comments