मिरज : मिरज शहरातील अमर
खड्डा आणि लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग
करणाऱ्या केंद्रावर, तसेच नाष्टा सेंटरवर महसूल विभागाने छापा टाकला. कारवाईत
घरगुती गॅस सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले. तहसील कार्यालय व
पुरवठा कार्यालयाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
शहरातील अमर खड्डा
परिसरामध्ये कच्छी हॉलसमोर हमीद फारूख हल्याळ (रा. कच्छी हॉलजवळ, मिरज) हा तरुण
वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
पथकाने दोन रिकामे सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजन
काटा, दोन गॅस नोझल आणि
दोन गॅस पाईप असे साहित्य जप्त केले.
दुसऱ्या कारवाईत, लक्ष्मी मार्केट
चौकातील सुरभी नाष्टा सेंटर येथे दीपक जगराम सहस्त्रबुद्धे आणि यासीन खुदबुद्दीन
पटेल हे व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना आढळून आले. येथे
घरगुती वापराचे दोन गॅस सिलिंडर आणि दोन रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले.
संशयितांवर द्रवीभूत इंधन गॅस (पुरवठा व वाटप नियंत्रण) आदेश २००० चे कलम ४ (१) चे
उल्लंघन जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये मिरज शहर पोलिसात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिली.
0 Comments