सांगली : जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल पेट्रोल
पंपाची परस्थिती गुरुवारी जैसे थे राहिली. जिल्ह्यातील २५६ पैकी जवळपास ६० टक्के
पेट्रोल पंप बंद राहिले. सांगली शहरातील केवळ तीन, चार पंपच दिवसभर
सुरु होते. याठिकाणी वाहन धारकांनी मोठी गर्दी केली होती. मागणी नोंदवूनही चार
दिवसापासून पुरवठा झाला नसल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली.
सांगलीतील बसस्थानक रोड, स्टेशन चौक, तरुण भारत
क्रीडांगण, मार्केट यार्ड आदी परिसरातील पेट्रोल पंप बंद होते.
विश्रामबाग चौक, माधवनगर रोडवरील काही पंप सुरु होते. याठिकाणी भल्या
मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुरू असलेल्या पंपावर वाहनधारक अधिक प्रमाणात इंधन
भरताना दिसत होते.
सांगली जिल्ह्यात २१ मे रोजी
पेट्रोलचा २५१५ किलोलिटर, डिझेल २८७० किलोलिटर तर एलपीजीचा १२६४.२ टन साठा शिल्लक
असून ९६.६ टन एलपीजी येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पुरवठा अधिकारी आशिष
फुलूके यांनी दिली. जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा १३०५ किलोलिटर, बीपीसीएलचा ६९० किलोलिटर
व एचपीसीएलचा ५२० किलोलिटर असा एकूण २५१५ किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा
आयओसीएल कंपनीचा १४२० किलोलिटर, बीपीसीएलचा ८१० किलोलिटर व एचपीसीएलचा ६४० किलोलिटर असा
एकूण २८७० किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा १०९६ टन, आयओसीएलचा ५५ टन
व बीपीसीएलचा ११३.२ टन असा एकूण १२६४.२ टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा ९६.६ टन
एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.
0 Comments