Ticker

6/recent/ticker-posts

पीएनजे अॅकॅडमीतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेते युवराज खटकेंचा गौरव








सांगली : शहर अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशनच्यावतीने १ मे ते २१ मे २०२६ अखेर उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ८ वर्ष ते खुल्या वयोगटातील १५० ते २०० खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. या सर्व खेळाडूंना नामांकित प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते युवराज खटके (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली धावणे, लांब उडी, गोळा फेक, लाटी-काठी अशा सर्व खेळांचे मार्गदर्शन करण्यात आले व दरम्यान सर्व खेळाडूंना दंडोबा डोंगर येथे ट्रॅकींगला देखील घेवून जाण्यात आले. सरतेशेवेटी या सर्व खेळाडूंचेमध्ये ८० मीटर, १०० मीटर, १ ते ३ कि. मी. धावणे, लांब उडी, गोळा फेक अशा स्वरुपात स्पर्धा देखील घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये ९६ खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये विजेतेपद मिळविले. दि.२२ मे रोजी शिबिराची सांगता झाली. व त्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ व सत्कार समारंभ खेळाडू, पालक व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी स्टेडियम येथे झाला व विजेत्या खेळाडूंनी प्रशस्तीपत्र व मेडल तसेच शिबिरामध्ये योगदान देणाऱ्या पालक व स्वयंसेवकांचा सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. कोणतेही मानधन न स्वीकारता गेल्या १५ ते २० वर्षांपासून निःस्वार्थपणे प्रशिक्षण देणारे युवराज खटके सर यांचा सांगली येथे PNJ अॅकॅडमी, सांगलीचे अध्यक्ष व सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत जाधव व सांगली वकील संघटनेचे माजी सह. सचिव विक्रमसिंह शिवाजीराव सावंत तसेच सर्व खेळाडू व पालक यांच्यावतीने युवराज खटके (सर) यांचा त्यांचे गेल्या १५ ते २० वर्षापासून देण्यात येणाऱ्या निःस्वार्थ बहुमुल्य मार्गदर्शनाच्या व प्रशिक्षणाच्या अनुषंगाने गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments