सांगली : प्रा. तौहीद मुजावर यांची फेडरेशन ऑफ
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर संघटना पुणेच्या मुख्य कार्यकारी मंडळात नेमणूक
करण्यात आली आहे. ही भारतातील सर्वात जुनी संघटना आहे. सांगली येथील प्रा. तौहीद
मुजावर यांना संघटनेच्या मुख्य कार्यकारी मंडळातील प्रवक्ते व जनसंपर्क अधिकारी
नेमण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे आणि करिअर
मार्गदर्शनातील अपार योगदानामुळे मुजावर यांना करिअरचा डॉक्टर म्हणून ओळखले जाते.
या प्रतिष्ठित पदावर निवड होणे हे प्रा. मुजावर यांच्यासाठी आणि त्यांच्या
संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले जात आहे. प्रा. मुजावर यांनी त्यांच्या
निवडीबद्दल आणि या जबाबदारीसाठी दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले.
माजी चेअरमन डॉ. संतोष बोडे, नवनियुक्त चेअरमन डॉ. तुषार सांगोळे आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये विराज
बर्गे, विपुल महिंदरकर, आशिष जवाके,
डॉ. संदीप मेश्राम, डॉ. जाहिर आलम, सुश्री जॅस्मिता कौर, प्रा. पितांबरे, प्रा. खालडकर, फैसल खान, बालिराम
मुतेकार, रोहिणी मुलाय, डॉ. हेमंत माळी,
प्रा. सुधाकर जाधव, सुषमा नायर आणि नीतु सिंघी
यांचे त्यांनी खास
करुन मनापासून आभार मानले आहेत. प्रा. तौहीद मुजावर
(एम. टेक सिव्हिल) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय करिअर कौन्सिलर आणि अनेक
विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या नोकरीस जोडणारे प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर आहेत.
ज्ञान वाटल्यास ते वाढते, संधी स्वीकारल्यास ती बदल
घडवते या विचाराने विद्यार्थी वर्गासाठी अहोरात्र कार्यमग्न असणारे प्राध्यापक
म्हणून तौहीद मुजावर सांगली जिल्ह्यात सर्वपरिचित आहेत.
0 Comments