Ticker

6/recent/ticker-posts

विकसित भारत निर्मितीसाठी 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करा : जिल्हाधिकारी

 

सांगली : विकसित भारताच्या निर्मितीतयुवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा असून जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करुन राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समिती बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी मेरा युवा भारत, सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक निखिल सावळे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाबासाहेब उजगरे उपस्थित होते.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि युवक संघटनांमार्फत जनजागृती करुन जास्तीत जास्त युवकांची 'माय भारत' पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विशेष करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'माय प्रयत्न भारत पोर्टल नोंदणी अभियान' पोस्टरचे अनावरण केले. राहुल डोंगरे यांनी युवा उपक्रमांचा आराखडा सादर केला. 'माय भारत' पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया दि. १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन विकसित भारताच्या उभारणीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments