Ticker

6/recent/ticker-posts

टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गुलमोहरचे सहा खेळाडू

 

सांगली : होतवार-रांची, झारखंड येथे होणाऱ्या २७ व्या मिनी व युथ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गुलमोहर व्यायाम संस्थेच्या सहा खेळाडूंची निवड झाली आहे. नुकत्याच अक्कलकोट येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्हा संघाने मिनी मुली व युथ मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मिनी संघात स्वर्णिमा प्रशांत गवळी, श्रेया श्रीकांत शिंदे, श्रावणी दादासाहेब तांबे, स्वाती प्रकाश बजबळकर यांचा समावेश होता.

युथ संघात पूर्वा प्रशांत पोंक्षे, सृष्टी श्रीकांत शिंदे, अंकिता महादेव सरगर,श्रावणी मारुती सरगर, साक्षी धुळाप्पा खांडेकर, सानवी कदम यांचा समावेश होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य मिनी संघात श्रेया शिंदे, श्रावणी तांबे, स्वाती बजबळकर यांचा तर युथ संघात पूर्वा पोंक्षे, सृष्टी शिंदे, अंकिता सरगर यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंना संस्थापक मिलिंद कुलकर्णी, सहकार्यवाह प्रा. दीपक राऊत यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जिल्हा संघटना सचिव डॉ. दशरथ देशिंगे, संस्था उपाध्यक्ष राजेंद्र कुष्टे, सागर घोंगडे, सहकार्यवाह सुशांत निकम, दौलत कोकाटे, महेश साळुंखे आदींचे प्रोत्साहन मिळत आहे.


Post a Comment

0 Comments