सांगली : जिल्हा
परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या इतिहासात २०१७ मध्ये पहिल्यांदाच २६ जागांवर
यश संपादन करून भाजपाने सत्ता काबीज केली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला
जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र जोरदार मुसंडी
मारली आहे. काँग्रेस, शिवसेनेलाही चांगले यश मिळाले आहे
काँग्रेस-राष्ट्रवादी
जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचले, असे असले तरी,
त्यांना बहुमतासाठी
एक जागा कमी पडत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यांपैकी
एका पक्षाने आघाडीला पाठिंबा दिला,
तर सत्तेचा मार्ग
मोकळा होईल, दुसऱ्या बाजूला भाजपला सत्तेत
येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य आणि रयत क्रांती या पक्षांची मदत भासणार आहे. या
पक्षांनी साथ दिली, तरच भाजप युतीला सत्ता मिळू शकते, अन्यथा सद्यस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता
मिळविणे सोपे दिसते.
जिल्हा परिषदेत
कोणताही एक पक्ष बहुमताजवळ पोहोचू शकलेला नाही. जिल्हा परिषदेच्या ६९ पैकी १८ जागा
जिंकून राष्ट्रबादी (शरदचंद्र पवार) पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपला १६, शिवसेनेला ७. राष्ट्रवादीस ६, काँग्रेसला ११ जागा
मिळाल्या आहेत, तर शिवसेना (उ. बा. या.), जनसुराज्य शक्ती आणि रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी १ जागा
मिळाली आहे. जिल्ह्यात एकही अपक्ष उमेदवार विजयी झाला नाही, मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता
स्थापनेसाठी कोण कोणाचा हात हातात येणार आणि बहुमताचे 'टायमिंग' साधणार, याबाबत उत्सुकता आहे.
सध्या तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पंचायत समित्यांवर
सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, शिवसेनेस प्रत्येकी दोन, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षास
प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता मिळाली आहे, मिरजेत भाजपला सेनेची
साथ लागणार आहे. तर शिराळयात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत सत्ता मिळवली.
जिल्हा परिषदेच्या ६
जागांपैकी जागांवर राष्ट्रवादी (शरदचंद पवार) पक्षाला यश मिळाले आहे. राष्ट्रवादी
आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ४८ ठिकाणी राष्ट्रवादी, १ जागा भाजपला आणि
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला ३ जागा मिळाल्या आहेत. या तालुक्यात दोन्ही
राष्ट्रवादींनी आपाड़ी घेतली आहे.
जिल्हा परिषदेतील
तालुकानिहाय संख्याबळ....
(आटपाडी)-शिवसेना २, राष्ट्रवादी १,
भाजप १,(जत)- भाजप ८. राष्ट्रवादी १,(खानापूर-विटा)-शिवसेना
४, राष्ट्रबादी १, कांग्रेस १, राष्ट्रवादी (श. प.) ४, (कडेगाव)-काँग्रेस ४,(तासगाव)- राष्ट्रवादी
१, काँग्रेस १, राष्ट्रवादी (श. प.) ४,(क. महांकाळ)-राष्ट्रवादी (श. प.) ३.
राष्ट्रवादी १,(पलुस)-काँग्रेस ४,(वाळवा)- राष्ट्रवादी (श. प.) ७, शिवसेना (उ.बा.ठा.) १, भाजप १, रयत क्रांती संघटना १, शिवसेना १,(शिराळा)- राष्ट्रवादी १, राष्ट्रबादी (श. प.) २, जनसुराज्य शक्ती १,(मिरज)-
भाजप ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी (श. प.) २. राष्ट्रवादी १
0 Comments