Ticker

6/recent/ticker-posts

मिरजेत दरोडा : १३ तोळे सोने, अर्धा किलो चांदीवर डल्ला

 


मिरज : मिरज शहरातील मंगळवार पेठ येथे मध्यरात्री उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने तब्बल १३ तोळे सोने, ६८२ ग्रॅम चांदी आणि २० हजारांच्या रोख रकमेवर डल्ला मारला. सोने, चांदी आणि रोकड अशा ९ लाख ६४ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी प्रदीपसिंह बाबूसिंग रजपूत यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी प्रदीपसिंह रजपूत हे मंगळवार पेठ येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी शहरातच नवीन घर बांधले आहे. ते त्या ठिकाणीच राहण्यासाठी जाणार होते. यासाठी त्यांनी जुन्या घरातील काही साहित्यही त्यांनी नवीन घरात नेले होते
शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रजपूत यांच्या घरातील सर्वजण नवीन घरात झोपण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरीस गेलेला मुद्देमाल मात्र  न्याच घरात होता. नवीन घरात जाताना रजपूत हे त्यांच्या घराच्या टेरेसचा दरवाजा बंद करण्यास विसरले, त्यामुळे हा दरवाजा उघडाच होता. दरम्यानरजपूत यांच्या घरावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने टेरेसच्या उघड्या असलेल्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्याची माळ, पोहे हार, गंठण, मंगळसूत्र, चेन आणि अंगठी असे ९ लाख १० हजार रुपयांचे १३ तोळे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे ताटवाटी, पंचपात्र, करदोडे, ब्रेसलेट, तोडे-वाळे, मनगट्या, चांदीचे बिस्कीटचांदीची नाणी, अशी ३४ हजार रुपयांची ६८२ ग्रॅम बजनाची चांदी व २० हजार असा मुद्देमाल लांपास केला. 

Post a Comment

0 Comments