अंकलखोप : महाशिवरात्री
हा सण अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव असल्याचे सांगत, या दर्शनाच्या
माध्यमातून लोकांमध्ये ईश्वरीय गुणांची जागृती व्हावी, असा उद्देश
भिलवडी सेवाकेंद्राच्या संचालिका मीरा बहनजी यांनी व्यक्त केला. औदुंबर येथे
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय
विश्वविद्यालयच्या वतीने प्रथमच भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या भिलवडी सेवाकेंद्राच्या सहयोगातून
भाविकांसाठी १००८ नारळांपासून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग दर्शनासाठी खुले
करण्यात आले आहे. यासोबतच मानवी जीवनातील गहन आध्यात्मिक रहस्ये उलगडणारे चित्र
प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. भक्तांसाठी ही पर्वणी ठरत आहे. या सोहळ्याचे
उद्घाटन उद्योजक गिरीश चितळे, उद्योजक राजेश चौगुले तसेच भिलवडी पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते शुक्रवार दि.१३ रोजी सायंकाळी
झाले. उद्घाटनानंतर 'जागरण अंतर्मनाचे' हा विशेष आध्यात्मिक
कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ब्रह्माकुमारी संस्थेच्या ज्येष्ठ वक्तत्या
ब्रम्हाकुमारी सुनिता बहनजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्य शोभाताई हजारे, हजराबी सलामत, आनंदा कुराडे यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments