सांगली : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथील काळ्या खणीतील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहे.
गटारीचे पाणी ज्याठिकाणी काळ्या खणीत मिसळते, त्याचेही पाणी
नमुने तपासणीस घेतले आहेत. दरम्यान, तपासणी अहवालानंतर आंदोलनाची पुढील
दिशा ठरवली जाणार आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन व कायदेशीर लढा देण्यात
येणार आहे, माहिती तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शंभूराज
काटकर, तानाजी रूईकर यांनी दिली.
तानाजी रुईकर म्हणाले, काळी खण प्रकल्पाचा मूळ उद्देश पाण्याचे प्रदूषण कमी करून ते प्रदूषणमुक्त स्वरूपात नागरिकांच्या वापरात आणणे हा होता. मात्र हा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाऐवजी महापालिकेने केवळ सौंदर्याकरणाकडे वळवला आहे. या प्रकल्पावर कोट्यवधी खर्च करून अनेक कामे बेकायदेशीररीत्या केली आहेत. काळ्या खणीसमोरील १८ मीटर रुंदीचा रस्ता १२ मीटरने करण्यात आला, रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी अरुंदीकरण केले आहे. नियमबाह्य पद्धतीने पादचारी मार्ग वाढविण्यात आला आहे. सामासिक
अंतर व सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळ्या खणीतील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. वस्तीतील गटारीचे पाणी ज्या ठिकाणी काळ्यात खणीत मिसळते, तेथील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान, यावेळी महापालिकेचे उद्यान अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0 Comments