Ticker

6/recent/ticker-posts

मिरजेतील तंतुवाद्य क्लस्टरसाठी निधी देऊ : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

 

मिरज : एआय च्या युगात, जीआय मानांकन मिळालेली तंतुवाद्येसुद्धा फार महत्त्वाची आहेत. मिरजेतील तंतुवाद्यांच्या क्लस्टर योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तंतुवाद्य निर्मिती करणाऱ्या कारागीरांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शासकीय योजनेतील व्याख्येत बदल केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी दिली.

मिरज येथे तंतुवाद्य निर्मिती केंद्रास मंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली व येथील तंतुवाद्य कलाकारांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर शेलार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. दीडशे वर्षांपूर्वी सतारमेकर कुटुंबीयांनी लावलेल्या तंतुवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. युवा कारागीर आता तंतुवाद्य निर्मितीत आधुनिक प्रयोग करीत आहेत. पारंपरिक वाद्य निर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत जुनी वाद्ये अधिक लोकप्रिय होत आहेत. निर्मितीची मोठी परंपरा असणाऱ्या मिरजेत तंतुवाद्य निर्मिती केंद्र विकसित झाले पाहिजे. एआय च्या युगात, जीआय मानांकन मिळालेली तंतुवाद्ये फार महत्त्वाची आहेत. मिरजेतील तंतुवाद्यांच्या क्लस्टर योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तंतुवाद्य निर्मिती करणाऱ्या कारागीरांना सुविधा मिळाव्यात, यासाठी सतार शासकीय योजनेतील व्याख्येत बदल केला जाईल.

यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, माजी सभापती सुरेश आवटी, भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि तंतुवाद्य निर्मिती करणारे कारागीर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments