Ticker

6/recent/ticker-posts

 

सांगली : येथील महापालिका शाळा नं. २, संत मामामहाराज केळकर विद्यामंदिर, येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय बेलवलकर, अश्विनी कुकडे, अनिता पवार, ऊर्मिला बेलवलकर, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, रवींद्र वादवणे, शुभम चव्हाण, रुद्र बावडेकर, माजी विद्यार्थी दत्तात्रय रहाटे, अमर सुतार, भावेश नाईक, बजरंग माने, माजी मुख्याध्यापक राकेश कांबळे, शाळा नं. ४ च्या मुख्याध्यापिका सुनीता वनखंडे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुप्रिया चोपडे, शर्मिला मोरे, दीपाली आटुगडे यांनी संयोजन केले.


Post a Comment

0 Comments