अन्न हे पूर्णब्रह्म
आहे. त्यामुळे राहिलेले अन्न टाकून न देता ते बहुतांश घरांमध्ये महिलांकडूनच खाल्ले
जाते. हे रात्री उरलेले शिळे अन्न खाल्ल्याने कसलीही बचत न होता आरोग्याची नासाडीच
जास्त होतेय. यामुळे महिलांमध्ये अनेक आजार उद्भवले जातायत.. ज्यामुळे महिलांमध्ये
चाळिशीनंतर अनेक व्याधींना सामोरे जावे लागतेय. कुटुंबाचे जेवण झाल्यानंतर उरलेले
अन्न फेकणे बरे वाटत नाही म्हणून बहुतांश गृहिणींना शिळे पदार्थ खाण्याची सवय
असते. मात्र, नेहमी नेहमी असे शिळे अन्न खाल्ल्यामुळे महिलांना
पोटदुखी, जुलाब, उलटी, अॅसिडिटीसह
फूड पॉयझनिंगसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
उष्ण, दमट वातावरणाने अन्न लवकर नासते
आजकालच्या धावपळीच्या
जगात वातावरणात बऱ्याचदा बदल होत आहेत. सकाळी जरी थंडी असली तरी दुपारी उष्ण व दमट
हवामान असते. आणि रात्री मात्र थंडीचे वातावरण असते. या बदलत्या वातावरणात अन्न
लवकर नासते.
रात्रीचा भात, पोळीचा नाश्ता
बहुतांश घरांत रात्री
केलेल्या अन्नातील भात, पोळी भाजी शिल्लक राहते. हे अन्न टाकून किंवा कोणा
प्राण्याला न देता घरातच दुसऱ्या दिवशीचा नाश्ता म्हणून वापरले जाते. आणि नाश्ता
हा दररोजच्या दिवसातील पहिले अन्न हे सात्त्विक, परिपूर्ण असणे
गरजेचे आहे.
बहुतांश महिलांना शिळे
खाण्याची सवय
रात्री राहिलेले अन्न
दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेचा डबा बनवून दिला जातो. तसेच ताजे अन्न पुरुषांना
खायला दिल्यावर बयाच कुटुंबांत महिला आधीचे शिळे अन्न जाणीवपूर्वक खातात. अन्न
वाया जाऊ नये, त्याची नासाडी होऊ नये ही त्यापाठीमागे भावना असते; परंतु असे शिळे अन्न सातत्याने खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारींना सामोरे
जावे लागते.
0 Comments