हिवाळा संपला असून
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा थेट
परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्राथमिक आरोग्य
केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत रुग्णांची
संख्या वाढत आहे. तसेच बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही
कडक उन्हात परीक्षेला जावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या पाऱ्याचा त्रास नागरिकांना
सहन करावा लागत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी होत आहे.
थंडी, ताप, उलट्यांच्या तक्रारी येत आहेत.
अशी काळजी घ्या. बाजारातील थंड पेये शक्यतो टाळा. रात्री थंड वाऱ्यात चेहरा झाकून घ्या.
घरात बनवलेले गरम अन्नच खा. मुलांसाठी पालकांवर जबाबदारी! बदलत्या हवामानाला लहान
मुले संवेदनशील असतात. या स्थितीत पालकांवरच त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी येऊन
पडते. उन्हापासून बचावासाठी थंड पेये आणि रात्रभर थंडी यामुळे प्रकृती बिघडून
उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे.
या टिप्स फॉलो करा
आजार अजितबात अंगावर काढू नका.
फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचे टाळा.
रात्री चेहरा झाकून प्रवास करा.
बदलते वातावरण
धोकादायक !
दिवसभर तापणारे ऊन आणि
रात्री गारवा असे विरोधाभासाचे वातावरण आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. अशा
सारख्या बदलत असलेल्या वातावरणाचा थेट परिणाम आता नागरिकांच्या आरोग्य होताना दिसत
आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात थंडी व तापाचे रुग्य वाढलेल आहेत. त्रास होऊन
उलट्या होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.
हिवाळा संपून
उन्हाळ्याच्या सुरुवातीचे हे दिवस आरोग्यासाठी संवेदनशील असतात. या स्थितीत
प्रकृतीची योग्य प्रमाणात काळजी घेणे योग्य ठरते. कोणताही आजार अंगावर काढू नका.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणतीही
लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत. रस्त्यावर उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.
0 Comments