Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणातील गुणांबरोबरच जीवनातील गुणवत्ता महत्वाची : प्रा. संजय ठिगळे

 

सांगली २१ व्या शतकातील शिक्षण पध्दतील गुणाच्या बरोबरीने जीवनातील गुणवत्ता महत्वाची आहे. खरेतर विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये संवेदनशील, शिस्तप्रिय आणि आत्मविश्वास असणारा विद्यार्थी हाच शिक्षणाचा खरा पाया आहे. यामुळे इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाबरोबरच भावनांक महत्वाचा असल्याचे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.
सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या पद्माळे येथील शामराव बंडूजी पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिकंदर जमादार होते. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक भानुदास शिदे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले. प्रा. संजय ठिगळे म्हणाले, कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुलांवर
शालेय जीवनातच संस्कार करणे गरजेचे असते. विशेष करून आत्मसन्मान जपणे आणि आई वडिलांच्या प्रती आदर ठेवणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण ज्या समाजातून आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात ठेवून कार्यरत राहण्याची गरज आहे. असे झाले तरच समाज व्यवस्था अधिक भक्कम होईल. प्राचार्य डॉ. शिकंदर जमादार म्हणाले, जगात विद्वतेला फार महत्व आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, समयसूचकता, दूरदृष्टी, अंगीकारण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमास पद्माळचे सरपंच एकनाथ कोळी, नानासो शिदे, शशिकांत जगदाळे, दत्तात्रय पाटील, सुनील मोरे, बाजीराव कोळी, शब्बीर करीम, प्रवीण सुतार, भाऊसाहेब चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी गणुवंत विद्यार्थी, खेळाडूंचे सत्कार करण्यात आले.


Post a Comment

0 Comments