Ticker

6/recent/ticker-posts

गुरुकुलमध्ये पाककला स्पर्धा उत्साहात

 

मिरज : गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनीमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा पार पडल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव अनिता वनखंडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी पदार्थांची चव चाखली व सर्वोत्कृष्ट पदार्थांचे क्रमांक देण्यात आले.

यामध्ये प्रथम क्रमांक दीपा संतोष सुनगार, द्वितीय क्रमांक स्वाती अमित कोरे, तृतीय क्रमांक अश्विनी आनंद लोकरे या स्पर्धकांचे क्रमांक आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे तसेच संतोष जाधव, ज्ञान प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, प्री प्रायमरी इन्चार्ज स्वप्नाली मेंढे, प्रज्ञा प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे व उपमुख्याध्यापिका सुजाता कदम, महिला पालक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना बसर्गे टीचर यांनी केले.


Post a Comment

0 Comments