सांगली : प्रभाग ७ मधील
रमाईनगर परिसरातील ड्रेनेज,
गटारी, पाणी पुरवठा
आदी - प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी - लावू, असे आश्वासन
महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले.
महापौर धीरज सूर्यवंशी
- यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील रमाई नगर परिसराला भेट देऊन - नागरिकांशी थेट संवाद
साधला. - येथील नागरिकांनी पाणीपुरवठा, - रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्था, -
स्वच्छता तसेच इतर मूलभूत - सुविधांबाबतच्या
प्रलंबित समस्या मांडल्या. महापौर सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच, प्रलंबित कामांचा आढावा घेऊन निश्चित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश
देण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमची प्राथमिकता
असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
0 Comments