Ticker

6/recent/ticker-posts

या सरकारचं करायचं काय? गॅस दरवाढीविरुध्द काँग्रेसची जोरदार निदर्शने

 


सांगली : या सरकारचं करायचं काय? अशी जोरदार घोषणाबाजी करत आणि 'कुठे आहेत अच्छे दिन?' असा सवाल करत गॅस दरवाढीविरुध्द गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली व शासनाचा निषेध केला. जिल्हा प्रशासनालाही याबाबत निवेदन देण्यात आले. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शन करण्यात आली. नाईक म्हणाले, शासनाने अचानकपणे गॅस दरवाढ केलेली आहे व गॅस सिलिंडर नोंदणीचा कालावधी वाढवला. २०१४ पासून 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून जनतेला महागाईच्या जोखडात साठा भरपूर असताना दरवाढ का? गॅसचा साठा भरपूर प्रमाणात असताना दरवाढ का करावी लागली? अतिरित्त जमा होणारे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बांधून ठेवले आहे. ४०० रुपयांचा सिलिंडर ८६० रुपयांपर्यंत गेला असताना आता परत ६० ते १२० रुपये दरवाढ केली. सरकारने याअगोदरच रॉकेल बंद केले आहे. अशा स्थितीत सामान्यांनी जगायचे कसे? गॅस दरवाढीविरुध्द कांग्रेस रस्त्यावर जोरदार निदर्शने यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक संजय मेंढे, हर्षवर्धन पाटील, अश्शिय कदम, अंजली जाध आशा पाटी मानसिंग शि नामदेव चव्हा शहाबाज नायकवत अख्तर अत्तार, गजान मिरजे, विशाल पडळक प्रवीण मंडले, धनराज सातपुते, योगे जाधव, डॉ. नामदेव कस्तुरे, प्रत चव्हाण आदी आंदोलनात सहभा झाले होते.


Post a Comment

0 Comments