Ticker

6/recent/ticker-posts

गॅसचा पुरवठा करा, अन्यथा हॉटेल बंद ठेवू

 


सांगली :  हॉटेल चालकांना पूर्ववत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, अन्यथा हॉटेल व्यवसाय बंद ठेवू, असा इशारा हॉटेल चालक संघटनेने गुरुवारी दिला. याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आले. व्यावसायिक गॅसचे किमान रेशनिंग करुन पुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल, खाद्यपदार्थ व्यवसायावर परिणाम झाला आहे. शहरातील हॉटेलही बंद पडू होत आहेत. याबाबत हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सांगली : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना हॉटेल व्यावसायिकांनी निवेदन दिले. किमान व्यावसायिक गॅसचे रेशनिंग करुन पुरवठ्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात अत्यावश्यक गॅसचा पुरवठा करावा, अन्यथा येईल, असे सांगितले. हॉटेल बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही, हॉटेल चालकांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबत मार्गदर्शन मागवून सांगली संजयनगरमधील सीएनजी गॅस पंपावर इंधनासाठी अशी मोठी रिक्षाचालकांची रांग लागली होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लह भडेकर, धरमेश शेट्टी, मिलिंद खिलारे, सतीश कुंभार, राघवेंद्र देवडिगा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments