Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

 


सांगली : रमजान ईदचा पवित्र सण शनिवारी सांगली शहरात श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक नमाज पठण केले. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते.

ईदगाह मैदानावर नुरानी मस्जिदचे मौलाना खालीद यांनी नमाज पठण केले. रमजान मस्जिदचे हाफीज गौस

यांनी खुदबा पठण केले, तर चांदतारा मस्जिदचे मुफ्ती मोसीन यांनी मजमा जोडणे आणि संदेश पठण करत बंधुत्व, शांतता आणि एकतेचा संदेश दिला.

यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात होती.

ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती

दर्शवली. यावेळी खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, माजी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्ष नेते नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे आदींसह ईदगाह कमिटीचे संचालक कय्यूम पटवेगार, जब्बार तहसीलदार, निसार संगतरास उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments