सांगली :
रस्त्यावरच्या अतिक्रमणावर आयुक्त कारवाई करीत आहेत, आता
आयुक्तांनी महापालिकेच्या जागेवर धनदांडग्यांनी केलेली अतिक्रमणे उदध्वस्त करुन
जागा ताब्यात घ्या, यात स्टेशन चौकातील साडेपाच एकर जागा, माळ बंगला
येथील मनपाची जागा मनपालाच विकण्याचा धक्कादायक प्रकार, यासह खुल्या
भूखंडावर धनदांडग्या लोकांनी केलेली अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी
स्थायी समितीचे माजी सभापती, जेष्ठ नगरसेवक हणमंतराव पवार यांनी पत्रकार बैठकीत
केली.
आयुक्त सत्यम
गांधी हे सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. शहरातील रस्त्यावरची काही अतिक्रमणे हटवली, याचे समस्त
सांगलीकरांनी कौतुकच केले आहे. ड्रेनेज योजनाही आयुक्तांनी अंतिम टप्प्यात आणली
आहे. आयुक्तांनी
महापालिका
क्षेत्रातील खुले भूखंड शोधून त्यावर महापालिकेचे नाव लावले आहे. १९४६ पासूनचे
भूखंड शोधून काढले आहेत. दोन हजार मालमत्ताचे स्कॅनिंगचे काम सुरु केले आहे, यात १३०१
मालमत्ता रोकॉर्डवर आणल्या आहेत. अब्जावधीची मालमत्ता मालकीची केली आहे. यातून
हजारो कोटीचे रोखे काढून शहराचा विकास योजनांसाठी निधी उभारता येणार आहे.
आयुक्त खुले
भूखंड ताब्यात घेत आहेत, ही बाब चांगली आहे. याच बरोबर आयुक्तांनी स्टेशन
चौकातील साडेपाच एकर जागा मनपाच्या मालकीची आहे, यातील ३० हजार
स्क्वेअरफुटाची जागा संस्थेला कशासाठी दिली? याची चौकशी
करावी, अशा काही
मोक्याच्या जागा विकण्याचा प्रयत्न होतो आहे. मालळ बंगला येथील सर्व्हे नं. ३३०२
मधील ३६ हजार ६०० चौरस मिटर
जागेपैकी
साडेनऊ एकर जागा महापालिकेच्या मालकीची जागा महपालिकेलाच विकण्याचा प्रकार घडला
आहे. सदर व्यवहार ६ कोटी ७० लाखाला २०१३-१४ ला केला गेला. यातील खरेदीपत्र चुकीचे
झाले असून सदर खरेदीपत्र रद्द करण्यात यावे, या संपूर्ण
प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी केली. राजमती कॉम्प्लेक्सच्या
मागील बाजूस असलेली जागा १९६२ साली लेआऊट मंजूर होता. या जागेला नाव लावून घ्या, असे यापूर्वीच
पत्र दिलेले असताना सदर खुली जागा चक्क विकली गेली आहे. वेळेत नाव न लावून
घेतल्याने सदर जागा विकली गेली, सदर खरेदीपत्र रद्द करुन संबधितांवर फौजदारी कारवाई
करण्यात यावी, अशा अनेक खुल्या जागांवर इमारती झाल्या आहेत, याचीही चौकशी
करण्यात यावी.
0 Comments