Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात

 


सांगली : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात मैदानी खेळ रंगले. सांघिक स्पर्धाही चुरशीने खेळल्या गेल्या. दुपारच्या सत्रात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धाही रंगल्या.

१०० मीटर आणि ४०० मीटर धावणे स्पर्धेसोबत गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, ४ बाय १०० रिले या मैदानी स्पर्धा पार पडल्या. याशिवाय खो-खो, क्रिकेट आदी सांघिक स्पर्धाही झाल्या. मंगळवारी झालेल्या ४ बाय १०० रिले स्पर्धेत पुरुष गटात जतने प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यालय संघाने द्वितीय आणि आटपाडी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. याच क्रीडा प्रकारात महिला गटात वाळवा संघाने प्रथम, पलूस संघाने द्वितीय, तर कडेगाव संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात आटपाडीचे रामेश्वर बनसोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कडेगावचे महेश कुंभार यांनी द्वितीय आणि पलूसचे सुरेश कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटात पलूसच्या अश्विनी यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्यापाठोपाठ कवठेमहांकाळच्या प्रज्ञा गेजगे यांनी द्वितीय आणि कडेगावच्या आशा पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.


Post a Comment

0 Comments