सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या शहरात अतिक्रमण
हटाव मोहीम सुरू आहे. काही आवश्यक ठिकाणी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे, याबाबत आक्षेप नाही. परंतु प्रत्यक्षात महापालिका प्रशासन गरीब व सर्वसामान्य
नागरिकांवरच कारवाई करत असून धनदांडग्या, व राजकीय
लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप
मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे. आज मनसेच्या वतीने
सांगली महानगरपालिकेसमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गरिबांचे छोटे व्यवसाय, हातगाडे, दुकाने यांच्यावर तात्काळ बुलडोझर चालवला जातो; मात्र शहरातील धनदांडग्या व प्रभावशाली लोकांनी उभारलेल्या मोठ्या बेकायदेशीर
इमारती, मॉल, हॉटेल्स, दवाखाने व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पी एंड जी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानासमोरील पार्किंग महापालिका
आयुक्तांना दिसत नाही का असा सवाल ही त्यांनी यावेळी मीडियाशी बोलताना केला आहे.
आर सिटी मॉल, पीएनजी ज्वेलर्स, कृष्णा हॉटेल, काळी खण, आयुक्तांचा बंगला, माळीज गोविंद
आयकॉन तसेच शहरातील काही मोठी हॉस्पिटल्स व व्यावसायिक संकुलांना नगर रचना
विभागाकडून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या
सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
तानाजी सावंत यांनी केली आहे .या प्रश्नांवर महापालिका प्रशासन मौन बाळगत आहे.
"गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा न्याय" असा दुजाभाव महापालिका
आयुक्त जनतेशी करत आहेत जे अत्यंत
अन्यायकारक आहे. असा आरोप तानाजी सावंत यांनी आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना केला
आहे. या आंदोलनात मनसे सैनिक तसेच काही स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
0 Comments