सांगली
: आर्टिफिशियल इंटिलीजन्सच्या
उत्पत्तीपासून ते सद्यःस्थितीपर्यंतचा प्रवेश उलगडून सांगताना आर्टिफिशियल
इंटिलीजन्स काही क्षेत्रामध्ये रोजगारसंबंधी समस्या निर्माण होत असल्याचे मत
आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये विख्यात लेखक आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी
व्यक्त केले.
व्ही.
पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चतर्फे सांगलीत आंतरराष्ट्रीय
कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी सीसायबर,
कोल्हापूरचे डायरेक्टर प्रा. डॉ. आर.के. टेलर होते.
तुर्की
येथील सिनॉप विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. गुल एकोरल बायराम, जर्मनी
येथे आर्टिफिशियल इंटिलीजन्स तज्ज्ञ ओजश्री भांडारे यांनी सहभाग घेतला. डॉ. आर.
एस. पुजारी आणि दिनेश कुडचे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॅझल डायन्याकोटचे
संचालक संदीप सोले यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, प्राचार्य
डॉ. आर. एम. यल्लट्टी,
परिषदेचे समन्वयक डॉ. ए. ए. सत्तीकर यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन डॉ. दीपा
पाटील आणि प्रा. स्वाती पाटील यांनी केले.
0 Comments