सांगली
: कर्नाटक, महाराष्ट्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्यांना आधार सोशल
फाऊंडेशन ट्रस्ट, बेळगाव
संस्थेच्यावतीने देण्यात येणारा नॅशनल फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड पुरस्काराने डॉ.
जयश्री पाटील व डॉ. श्रेणिक पाटील यांना गौरवण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूर
येथे झाला.
या
दोघांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय
तसेच प्रेरणादायी कार्याच्या माध्यमातून समाजासाठी योगदान दिले आहे. आदर्श
रणरागिणी प्रेरणा गौरव राज्य पुरस्कार डॉ. प्रा. राजा माळगी यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments